Monday 29 January 2007

कशासाठी..

किती सगळे जण आपण या blog वरती लिहीतोय नाही का ? कशासाठी बरं लिहीत असु आपण सगळे ? मला तर वाटतं संवादाची गरज इतकच उत्तर असेल याचं! कुणाला तरी काही तरी सांगावसं वाटतं. हे कुणीतरी म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसुन आपण स्वतःही असु शकतो. आपला आपल्याशी संवाद हा खरं तर सर्वाधिक गरजेचा आहे. त्या संवादातुनच आपलं खरं रुप उलगडत जाईल. आपलीच आपल्याला ओळख पटत जाईल. हल्ली तर मी असेही किती लोक पाहतेय की जे प्रत्यक्षात व्यवस्थित संवाद साधु शकत नाहीत पण लिखाणातुन ते साध्य करु शकतात. त्या लोकांसाठी blog विश्व म्हणजे वरदानच की...
पण प्रत्यक्ष संवाद टीकुन रहावा हे मात्र खरं ...

1 comments:

Nilesh said...

agadi yogya bolalat......me blog lihinyacha karan javaljaval sarakhach aahe