Tuesday 6 March 2007

माफ करा...

"हो माझी चुक झालीये खरच चुकले मी पण आता माफ कर. म्हणजे जन्मभर तो सल टोचत जगायला लागणार नाही" आपण असं म्हणल्यावर एखाद्या मित्रानी स्वच्छ शब्दात "नाही" असं उत्तर दिलं तर कसं वाटेल? आपण तरी कशाला माफी मागावी? बर! आधी चुक तरी करावीच कशाला? वाट्टेल तसं वागायचं आधी आणि मग माफी मागायचं नाटक... सौ चुहे खाके बिल्लि चली हजको. .... अश्या किती प्रतिक्रीया मनात येतील नाही ? पण घडुन गेला गुन्हा तर काय करायचं मग ..? खरय सगळंच.. ही पण एक मजा आहे नाही? काही काही परीस्थितीत सगळच खरं असतं...

अगदी घोर अपराध घडलाही असेल कदाचित हातुन. पण माफी नाही.....? कधीच नाही.....? हम्म..

चला एक समाधान तेवढच हाताला लागलं त्यानी शिक्षा देण्याचा अधिकार तरी उपभोगला हेही नसे थोडके... त्यानी सुख मिळणार असेल तर मिळो बापडं...!! मला जमेल का असं कुणी माफी मागायला आलं तर असं नाही म्हणायला? कसाही असेना पण कधी आपला कुणी मित्र स्नेही.. कुणी असेल त्याला?

खरं म्हणजे इतकच सांगायचय तुम्हाला जर कधी तुमचा कधी मित्र, मैत्रिण कुणी कधी चुकलं असेल. पण माफी मागायला आलं तर दिलखुलासपणे माफ करा.... एखाद्या मित्रानी मैत्रिणीनी आपल्याला कधीच माफ न केल्याच्या यातनांमधे जगत राहणं म्हणजे काळ्यापाण्याची शिक्षाच की ती.... खरोखर तुम्हाला खुप त्रास झाला असेल त्याच्या / तिच्या वागण्याचा पण तरीही सगळं विसरुन जवळ करायला विसरु नका त्याला / तिला.....

4 comments:

Anamika said...

अस म्हणायला खूप सोपे आहे कि चुकल कि माफ़ी मागायची. पण आपली चुक आहे हे मान्य करता आल पाहीजे ना ! कोणालाच अस वाटत नाही कि तो स्वत: कधी चुकतो कारण त्याच्या प्रत्येक चुकीचे त्याच्याकडे explanation असते.

Meenakshi Hardikar said...

हो ना हे ही खरच की पण मग काय करायचं ? नुसतं रुसुन बसणार का कायम ? :)) असो. Happy Women's Day to you..!!

मल्हारी said...

विचार खूप छान, स्तुत्य आहे. पण अमलात आणायला महा मुश्किल!:-)

माणिक said...

सहि है मीनू !
अगदि खरंय !