त्या रणरणत्या दुपारी AC बंद आणि खिडक्याही बंद असलेल्या हापिसात काम करण शक्य नसल्याने मी net surfing करत होते ..
इतक्यात साहेब आला, म्हणाला "काय हे ? किती हा TP? तुम्ही काम कधी करता ..? मी हे अजिबात खपवुन घेणार नाही .."
मी म्हणाले " असं का ? अरे वा ..!!"
नंतरच्या एका रणरणत्या दुपारी मी साहेबाच्या केबीनात शिरले .. साहेब कुणी तरी पाठवले mail forwarded joke वाचण्यात मग्न होता ..
तो म्हणाला " mail box clean करण्या आधी बघुन घ्यावं म्हणलं काय काय आलय ..? लोकं काय वाट्टेल त्या mail पाठवतात आता हाच विनोद पहा out of office - auto reply मधे कसे मजेमजेचे निरोप देता येतील ते लिहीलय .."
मी म्हणाले " असं का ? अरे वा ..!!"
(समाप्त)
प्रेरणा : http://www.101zenstories.com/index.php?story=3
Thursday 15 March 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
असं का ? अरे वा..:)
असं का ? अरे वा..:)
सहज, हरेकृष्णजी ... :))
Post a Comment