Friday 16 March 2007

मस्त वाटतय..!!

वा! वा! कसलं सही वाटतय आत्ता या क्षणी..
का म्हणून प्रश्न पडला असेल? आजचा शुक्रवार आणि उद्यापासुन सुरु होतो एक looooooooooooooooong वीकेंड.. कंपनी नवीन जागेत जातीये म्हणुन चक्क पाच दिवस सुट्टी! हा असा चमत्कार आजतागायत झाला नाही अन यापुढेही होणे नाही :D एकंदरीत काय तर माझी मस्त चंगळ आहे. नेहेमीप्रमाणेच मग या नऊ दिवसात काय करायचं याचे ढीगभर मनसुबे रचलेत. खरेदी, मनोरंजन आणि अर्थातच कामाची हीssssssssssssssss मोठ्ठी यादी आहेच.
नेहेमीप्रमाणेच मला याही वेळी सुगॄहीणी बनायचा attack काही काळापुरताच टीकलाय. :PP म्हणजे दर वेळी मला खुप सुट्टी मिळाली की मी ठरवते रोजच्या रोज घरातली धुळ झटकायची, रोज तिन्ही त्रिकाळ खायचे मस्त मस्त पदार्थ बनवायचे एकदम टीपिकल हिंदी सिनेमा हिरवाईन टाइप अगदी आदर्श पत्नी, माता वगैरे बनायचं :P .... हमखास त्याच दिवशी संध्याकाळी मला या सुगृहीणीच्या नाटकाचा कंटाळा येतो. मग माझ्या अंगात एकदम बॆचलर मोड संचारतो. मग चक्क बाहेरुन एक पाकीट मेथीचे पराठे, पुरण पोळी वगैरे आणुन ठेवुन सगळ्या पसाऱ्यात बसुन मी उगीच तिसरच काहीतरी करत बसते. उदा. आत्ता हे पोस्ट छापतेय ते ... नाहीतर कुठला तरी सिनेमा आणुन पहाणे, उगाच लोळत पडणे इत्यादी इत्यादी.. चलो ९ दिवस फुल्ल टीपी..... :DDD

3 comments:

श्यामली said...

मै आ रही हु रे तेरे साथ टीपी करने को :D
दोघी मिळुन टीपी करु या
९ दिवसातला १ दिवस माझा ?

HAREKRISHNAJI said...

मज्जाच आहे

Meenakshi Hardikar said...

हरेकॄष्णजी खरय अगदी मज्जाच आहे. बर तुम्ही नियमीत माझ्या लिखाणावर प्रतिक्रीया देता त्याबद्दल धन्यवाद !!
श्यामले वाट पहातेय..