Friday 23 March 2007

बातम्या

कधी नव्हे ती एवढी सुट्टी मिळाली. मग स्वाभाविकपणेच पेपर वाचायला, बातम्या पहायला आणि अर्थात त्यावर विचार करायला खुप वेळ मिळाला. कसल्या कसल्या भयानक बातम्या तरी निठारी हत्याकांड, बॉब वुल्मर यांचा मृत्यु एक ना अनेक. खरच सुन्न व्हायला झालं. या असल्या भयानक बातम्यांपाठोपाठ कुठल्या तरी फॅशन शोची माहिती. काय आणि कसं पचवावं तेच कळेनासं झालं.
मी लहान होते तेव्हा दूरदर्शनवर बातम्यांची वेळ होती साडेसातची. पण सध्या काही काही वाहीन्यांवर चोवीस तास बातम्या दाखवतात. चोवीस तास दाखवण्याइतक्या सनसनाटी, गुन्हेगारीच्या बातम्या कुठुन आणणार मग त्याच त्याच चार बातम्या घोळुन घोळुन दाखवायच्या, तेच ते बोलणं त्यांच्या वार्ताहराचं (तो बापडा तरी वेगळं काय सांगणार म्हणा...?), मग त्याच त्या मुलाखती पिडीतांच्या अथवा संबंधितांच्या..
काय दाखवावं ऐकवावं याला काही बंधनं, नियम काही नाही. जाहीरात केल्यासारख्याच बातम्या अधिकाधिक आकर्षक करण्याकडे कल. शी! किळस वाटायला लागली बघुन. गुन्हेगारांचे चेहरे आपल्या वाहीनीवर दाखवता यावे म्हणुन किती तो खटाटोप. विधायक असं काही कुठे घडतच नाही का? असा प्रश्न पडावा अशी परीस्थिती आहे. पूर्वी दूरदर्शनवर बातम्या किती तरी संयत स्वरुपात दाखवायचे. उगीच वास्तववादी म्हणता म्हणता वास्तववादीपणाचा अतिरेक होऊन पुन्हा वास्तवापासुन लांबच राहतो की काय आपण सगळे असं वाटतय.. बरं वास्तव असेलही पण म्हणुन त्याचा इतका मारा कशासाठी दर अर्ध्या तासानी तेच तेच सांगीतलं तर वास्तव अधिक वास्तव वाटतं असं आहे का?

0 comments: