Monday 9 July 2007

सहजच

चला बरेच दिवसांनी काही तरी लिहावसं वाटतंय? आणि गम्मत म्हणजे काय लिहायचंय ते माहीत नाही. असो असचं काही तरी मैत्रिणीला पत्र लिहील्यासारखं किंवा आपलिच डायरी लिहील्यासारखं लिहावं. असं लिहायलाही मजा येते. रोज मनात येणारे असले छोटे मोठे विचार बोलले की बरं वाटतं.

बाकी एक मात्र मान्य करावच लागेल सध्या दिवस सॉलिड मस्त चाल्लेत. माझे दिवस मस्त चाल्लेत याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की माझ्याकडे मला आवडणारं असं खूप काम आहे. नविन शिकण्यासारखं, कंटाळवाणं वाटणार नाही असं.

पुण्यात पावसानी बरेच दिवस कहर मांडला होता. आता गेले काही दिवस तो थांबलाय. तसं पुणं मस्तच आहे. पण सध्या वाढती लोकसंख्या आणि वाहनांची प्रचंड गर्दी यांनी अगदी नकोसं वाटायला लागतं. लहान असताना सायकलस्वारांचं असलेलं पुणं आता चारचाकी, दुचाकींनी अगदी भरुन गेलयं.

1 comments:

Sumedha said...

वा! तुझे दिवस असेच सॉलिड मस्त असुदे, कायम :) आणि पुणं पण कायम मस्तच राहूदे!!