आज काय तसं काही खास नाही. आहे थोडा वेळ हाताशी इतकच. ऑफिसमधे chess championship tournament चालू आहे. अस्मादिक organiser म्हणुन काम पहात आहेत. एकंदरीत अवघडच आहे हा खेळाचा प्रकार. अतिशय जास्त आवश्यकता आहे ती patiently विचार करुन हालचाल करायची. वर परत वेळेची टांगती तलवार आहेच डोक्यावर. oraganise करायला मजा येतेय खरी पण आश्चर्याची आणि खेदाची बाब म्हणजे चौतीस खेळाडूंनी भाग घेतलाय आणि त्यात एकही स्त्री खेळाडू नाही. सहज काही जणींना विचारलं तर बहुतेक जणींचं एकच उत्तर की कधी खेळलोच नाहीये गं ! खरंय निवांतपणे तासनतास एकाजागी बसुन खेळायला मिळालं नसेल. प्रत्येकीची मनापासुन ईच्छा आहे मात्र खेळायची. मग काय त्यांच्यासाठी खास friendly matches ठेवायची कल्पना सुचलिये. उगीच स्पर्धेचा ताण नको आणि खेळताही येईल. हं असच करावं ..
काल नेरळजवळ सगुणाबागेत एक दिवसीय सहल झाली. काय एकापेक्षा एक सुंदर फुलं होती. जास्वंदाचे तर केवढे रंग आणि प्रकार .. वा! मजा आली... हायब्रीड प्रकारचा जास्वंद मस्तच ... एक फुल त्याच्या मधे दांडा आणि वर परत दुसरं छोटसं फुल. एक तर केळीचं का कसलं फुल होतं. फुल कसलं एक लांबच लांब सुंदर आकाराचं पानच होतं ते. पिवळ्या आणि लाल रंगाच सुरेख मिश्रण, महिरप काढावी तशी छोटी छोटी पानं कि फुलं कि पाकळ्या बाजूला. किती सुंदर रंगछटा. वेळ झाला कि फोटोचं अपलोड करते. बाकीही खुप फुलं. फुलं दिसली कि काय प्रसन्न वाटतं नाई? ज्यांचं नुसतं असणं आणि दिसणं इतकं प्रसन्न असतं ती फुलं भाग्यवान खरी!
Monday 16 July 2007
Monday 9 July 2007
सहजच
चला बरेच दिवसांनी काही तरी लिहावसं वाटतंय? आणि गम्मत म्हणजे काय लिहायचंय ते माहीत नाही. असो असचं काही तरी मैत्रिणीला पत्र लिहील्यासारखं किंवा आपलिच डायरी लिहील्यासारखं लिहावं. असं लिहायलाही मजा येते. रोज मनात येणारे असले छोटे मोठे विचार बोलले की बरं वाटतं.
बाकी एक मात्र मान्य करावच लागेल सध्या दिवस सॉलिड मस्त चाल्लेत. माझे दिवस मस्त चाल्लेत याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की माझ्याकडे मला आवडणारं असं खूप काम आहे. नविन शिकण्यासारखं, कंटाळवाणं वाटणार नाही असं.
पुण्यात पावसानी बरेच दिवस कहर मांडला होता. आता गेले काही दिवस तो थांबलाय. तसं पुणं मस्तच आहे. पण सध्या वाढती लोकसंख्या आणि वाहनांची प्रचंड गर्दी यांनी अगदी नकोसं वाटायला लागतं. लहान असताना सायकलस्वारांचं असलेलं पुणं आता चारचाकी, दुचाकींनी अगदी भरुन गेलयं.

Subscribe to:
Posts (Atom)